शिवराई छ. शिवाजी महाराजांची अनुभूती देतात : ऐतिहासिक नाणी संग्राहक राजा जाधव

शिवराई छ. शिवाजी महाराजांची अनुभूती देतात : ऐतिहासिक नाणी संग्राहक राजा जाधव

*कोकण Express*

*शिवराई छ. शिवाजी महाराजांची अनुभूती देतात : ऐतिहासिक नाणी संग्राहक राजा जाधव*

*तळेरेतील निकेत पावसकर यांच्या संग्रहात शिवराई*

*कासार्डे ; संजय भोसले*

ही शिवराई नाणे कदाचित छ. शिवाजी महराजांनी प्रत्यक्ष हातात घेतले नसेल. मात्र, त्यावेळी स्वराज्यातील मावळ्यांनी ही नाणी हाताळली आहेत. म्हणजेच अप्रत्यक्ष छ. शिवाजी महाराजांचा स्पर्श या नाण्यांना झालेला आहे. त्यामुळे ही नाणी जपून ठेव, असा सल्ला तळेरे येथील नाणी संग्राहक आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना मुंबई येथील शिवकालीन नाण्यांचे संग्राहक राजा जाधव यांनी दिला.

तळेरे येथे निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला राजा जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. शिवाय शिवराई नाण्यांसह इतर अनेक ऐतिहासिक नाणी निकेत पावसकर यांना भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राजा जाधव यांच्याकडे 500 पेक्षा जास्त शिवराई तर ऐतिहासिक 15 हजारपेक्षा जास्त दुर्मीळ नाणी संग्रहात आहेत.

नान्यांचा खजिना दिला भेट (चौकट)

या भेटी दरम्यान राजा जाधव यांनी निकेत पावसकर यांना कुशान-1 व 2, वैष्णोदेवी नाणे, 1970 ची उलटा सुर्य व कमळ असलेली नाणी, दिदारानी काश्मीर, नागपुर भोसला, महमद बीन तघलघ (1200 ते 1400), हैद्राबाद निझान (चांदीचे नाणे), होळकर इंदौर (चांदीचे नाणे) आणि शिवराई अशा 38 दुर्मीळ आणि ऐतिहासिक नाण्यांचा खजिना भेट दिला.

निकेत पावसकर यांच्याकडे विविध 15 देशांच्या नाणी आणि नोटांसह अत्यंत दुर्मीळ नाणी आणि नोटा संग्रहात आहेत. याबाबत बोलताना निकेत पावसकर म्हणाले की, आजवर भेट म्हणुन मिळालेल्या वस्तूत राजा जाधव यांनी दिलेल्या “शिवराई” ह्या माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. राजा जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे या शिवराई शिवजयंतीला देव्हार्यात पुजेला ठेवण्यात येणार आहेत.  या शिवराईच्या माध्यमातून खरे तर अनेकदा छ. शिवाजी महाराजांची अनुभूती मिळत असल्याची माहिती पावसकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!