तळेरे रिक्षा संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात : विविध कार्यक्रमांनी रंगत

तळेरे रिक्षा संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात : विविध कार्यक्रमांनी रंगत

*कोकण Express*

*तळेरे रिक्षा संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात : विविध कार्यक्रमांनी रंगत*

*कासार्डे ; संजय भोसले*

तळेरे येथील रिक्षा संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्त रात्रौ गितगंध हा बहारदार मराठी गितान्चा कार्यक्रम सादर झाला. या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तळेरे येथील रिक्षा संघटनेचा वर्धापन दिन दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यावेळी यानिमित्त सकाळी सत्यनारायण महापूजा, त्यानंतर गोवळ गावठण येथील श्री पावणादेवी ढोलपथक यांचे ढोलवादन झाले. त्यानंतर आरती व तिर्थप्रसाद दू. 3 ते 5 वा. हळदीकुंकु समारंभाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सायंकाळी नवनियुक्त सरपंच व पंचक्रोशीतील माध्यमिक विद्यालयातील 10 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यान्चा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे गावठण बुवा संतोष तळेकर यांचे सुश्राव्य भजन झाले. रात्रौ  मराठी गितान्चा बहारदार कार्यक्रम गीतगंध हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान तळेरे पंचक्रोशी आणि जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी भेट देऊन रिक्षा संघटनेला शुभेच्छा दिल्या.

गेली अनेक वर्षे रिक्षा संघटना आपल्या वर्धापन दिनाच्या निमीत्ताने हलता देखावा ठेवला जातो. हा देखावा बघण्यासाठी दिवसभर मोठ्यांसह लहान मुलेही मोठ्या प्रमाणत हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!