मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून अज्ञात चोरट्याचे पलायन

*कोकण Express*

*मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून अज्ञात चोरट्याचे पलायन*

माजगांव दत्तमंदिर परिसरातील खळबळजनक प्रकार

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी शिरोडा मार्गावर माजगाव दत्त मंदिर परिसरात एका अज्ञात चोरट्याकडुन मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेल्याचा प्रकार घडला आहे. आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा प्रकार घडला. कांचन अनिल शिरसाट (रा. सालईवाडा ) असे त्या महिलेचे नाव असून अचानक झालेल्या या प्रकारामुळे संबंधित महिला प्रचंड घाबरली. याबाबतची माहिती माजगांव येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरजकर यांनी दिली.

सालईवाडा येथे राहत असलेल्या शिरसाट या सकाळी मॉर्निंग वॉक साठी मळगाव मेट परिसरात आल्या होत्या. तिथून परतत असताना मागाहून धावत आलेल्या अज्ञात चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून घेत पळ काढला. अचानक मंगळसूत्र ओढल्यामुळे त्या खाली पडल्या त्यांनी या बाबतची माहिती परिसरातील ग्रामस्थांना दिली. त्या नुसार चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!