नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

*कोकण Express*

*नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*

*कासार्डे ; संजय भोसले*

आदर्श एज्युकेशन सोसायटी, खारेपाटण संचलित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या तसेच जागतिक विकासात योगदान देणाऱ्या अग्रगण्य महिलांच्या प्रातिनिधिक सन्मानार्थ विद्यालयातील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर महिला सहयोगीनी व विद्यार्थिनी यांनी मिळून विविध खेळांचे आयोजन केले. या खेळांमधील  शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांनी खेळलेले क्रिकेटचे सामने फारच कौशल्यपूर्ण व रंगतदार झाले.

महिला ही सर्व संपन्न आणि समृद्ध वसुंधरेसमान आहे ही सद्भावना अभिव्यक्त करीत महिलेस सादर वंदना करणारे प्रबोधक रेखाटन विद्यालयाच्या फलकावर चितारण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या विद्यालयाच्या या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर महिला सहयोगिनी या सर्वांना विशेष भेटवस्तू संस्था व विद्यालयाचे समन्वयक पराग शंकरदास, मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई व पर्यवेक्षक राधेश्याम पांडेय यांच्या हस्ते सादर प्रदान करून सर्व महिलांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!