*कोकण Express*
*शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक ११ मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*कणकवलीत होणार शिवसेनेचा भव्य मेळावा;जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक ११ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर इत आहेत. शनिवारी दुपारी ३ वा. कणकवली मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे श्री. फाटक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. तसेच मातोश्री मंगल कार्यालय येथे शिवसैनिकांचा मेळावा व सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा सत्कार व अन्य पक्षप्रवेश होणार आहेत. तरी शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कणकवली तालुकाप्रमुख परुळेकर यांनी केले आहे.