*कोकण Express*
*भिरवंडे येथील सिताराम सावंत यांचे निधन*
कणकवली ः प्रतिनिधी*
भिरवंडे-हनुमंतवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सिताराम यशवंत सावंत उर्फ एस. वाय. कंडक्टर (87) यांचे रविवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांनी सुरुवातीला मुंबईत बीईएसटीमध्ये कंडक्टर म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर गावी येवून ते एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कणकवली आगारात रुजू झाले. कणकवली-निपाणी या फेरीवर ते कायम ड्युटीवर असत. कणकवली आगारात ‘भावोजी’ म्हणून ते ओळखले जात होते. कंडक्टर म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर भिरवंडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते निवडून गेले होते. गावच्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात ते अग्रेसर होते. विनोदी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचित होते. एस.वाय. कंडक्टर यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. कनेडी बाजारपेठेतील उद्योजक उमेश सावंत, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान महेश सावंत यांचे ते वडील होत.