*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज ६ कोरोना पॉझिटिव्ह…*
*डॉ.एस.एच.चव्हाण त्यांची माहिती*
*जिल्ह्यात २१३ सक्रिय रुग्ण…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.०१:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५११ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.