*कोकण Express*
*विकास संस्था गावच्या विकासाचे केंद्र बनावे ;मनीष दळवी…*
*शिरगाव ःःप्रतिनिधी*
गावची विकास संस्था ही आपल्या हक्काची संस्था आहे . शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जिल्हा बँक विविध योजना राबवित आहेत .म्हणून विकास संस्था ही गावच्या विकासाचे केंद्र बनावे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी साळशी येथे केले
साळशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने शेतकर्यासाठी कर्जविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते विकास संस्थाही शेतकऱ्यांची विकास बॅक बनली पाहिजे.त्यासाठी जिल्हा बँकेकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल असे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे संचालक अँड प्रकाश बोडस यांनी विकास संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवू शकता असे सांगून संस्थेमार्फत आपण घेतलेले कर्ज ते वेळेवर फेडणे ही तेवढीच आपली जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन सत्यवान सावंत, व्हाईस चेअरमन सिताराम नाईक ,संचालक विलास साळसकर, सरपंच वैशाली सुतार, देवगड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष नार्वेकर ,शैलेश जाधव, संतोष कुमार फाटक ,शिरगाव सोसायटी चेअरमन मंगेश लोके , पोलीस पाटील कामिनी नाईक , जिल्हा बँकेचे अधिकारी कुुडतरकर ,शिरगाव शाखा व्यवस्थापक जंगले, संस्थेचे सचिव धरणे, शेतकरी, आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यानी केले. तर आभार विलास साळसकर यांनी मानले.