मिळून साऱ्याजणी च्या वतीने ८ मार्च रोजी विविध स्पर्धा

मिळून साऱ्याजणी च्या वतीने ८ मार्च रोजी विविध स्पर्धा

*कोकण Express*

*मिळून साऱ्याजणी च्या वतीने ८ मार्च रोजी विविध स्पर्धा..*

*महिलांनी उपस्थित राहण्याचे नीलम सावंत यांचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

८ मार्च हा जागतिक महिला दिन, मिळून साऱ्याजणी महिला मंच गेली १९ वर्ष सातत्याने महिलांसाठी आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या विसाव्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री मंगल कार्यालय येथे केले आहे. या निमित्त २.३० ते ३.३०, पाककला स्पर्धा, स्पर्धेतील पदार्थ शाकाहारी किंवा मांसाहारी असा कोणताही एकच पदार्थ घरी बनवून आणणे.

या पदार्थाची सजावट सुद्धा खाण्यायोग्य अशा गोष्टींनी करणे, चार्मिंग लेडी स्पर्धा. ही स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी असून, स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांना आधी चार दिवस प्रशिक्षण दिले जाईल., भाग घेणाऱ्या महिलांना वयाची अथवा इतर कोणतीही अट नाही., मात्र अगोदर नोंदणी आवश्यक. समाजासाठी आणि कुटुंबासाठी विशेष असे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, उद्योगिनी पुरस्काराचे वितरण, महिलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम.

यात रेकॉर्ड डान्स, मिमिक्री, एकपात्री अभिनय, कविता, महिलांसाठी संदेश पर भाषण, उस्फूर्त प्रतिसाद याद्वारे सादरीकरण अशा विविध मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. जागतिक महिला दिन ८ मार्च, बुधवार या दिवशी मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे दुपारी दोन विविध कार्यक्रम ची रेलचेल दुपारी २ वाजल्यापासून असणार आहे. फक्त महिलांसाठी असलेल्या मिळून साऱ्याजणी महिला मंचच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मिळून साऱ्याजणी यांच्यावतीने नीलम सावंत – पालव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!