पालिका प्रशासनात वाढवलेली पाणीपट्टी व घरपट्टीला तात्पुरती स्थगिती

पालिका प्रशासनात वाढवलेली पाणीपट्टी व घरपट्टीला तात्पुरती स्थगिती

*कोकण Express*

*पालिका प्रशासनात वाढवलेली पाणीपट्टी व घरपट्टीला तात्पुरती स्थगिती*

*शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती*

*सावंतवाडी ःःप्रतिनिधी* 

येथील पालिका प्रशासनाच्या माध्यमातून वाढविण्यात आलेल्या पाणीपट्टी व घरपट्टीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली होती व वाढीव कर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभारी प्रशासकांना दिले आहे. तसे त्यांनी पत्र आज दिले असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. ते आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कर वाढ करण्यात आली याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती. आपल्याला कळल्यानंतर या कर वाडीला आपण तात्काळ स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली. सद्यस्थिती लक्षात घेता राज्य अन्य कोठेही कर वाढ झालेली नाही. त्यामुळे तूर्तास या वाढीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी आपण मागणी केली होती. त्यानुसार आवश्यक असलेले आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!