अभिनेते अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी, श्वास घेण्यास अडचण

अभिनेते अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी, श्वास घेण्यास अडचण

*कोकण Express*

*अभिनेते अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी, श्वास घेण्यास अडचण..*

चित्रपट अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन देशातील हैदराबाद येथे शूटिंग करताना जखमी झाले आहेत. त्यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे. ते सध्या मुंबईतील आपल्या घरी आराम करत आहेत. ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे चित्रीकरण करताना अमिताभ जखमी झाले आहेत.

अमिताभ बच्चन हे साऊथचा अभिनेता प्रभासच्या ‘प्रोजेक्ट K’ या चित्रपटाचे शूटिंग करत करताना जखमी झाले. त्यात एक अ‍ॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली आहे. हैदराबादमधील उपचारानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी ही एक वाईट बातमी आहे.

अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या माहीतीनुसार, “बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले आहेत. आता या चित्रपटाचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. पट्टी बांधली असून, उपचार सुरू आहेत. खूप जास्त वेदना होत आहेत. हालचाल करण्यास जास्त त्रास होत आहे. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. या वेदना कमी करण्यासाठी मला काही औषधी देण्यात आलीत. यातून सावरण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील”, अशी त्यांनी माहीती दिली आहे.

पुढे म्हणाले, “मी बरा होईपर्यंत सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. मी जलसामध्ये विश्रांती घेत आहे. फक्त गरजेच्या गोष्टींसाठी थोडेसे चालावे लागणार आहे. याशिवाय आराम तर सुरूच राहणार असून फक्त मी जलसाच्या गेटवर माझ्या चाहत्यांना आता काही दिवस भेटू शकणार नाही, हे सांगणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. जलसावर येण्याचा विचार करणाऱ्यांना सध्या त्यांना याची माहिती द्या. बाकी सर्वकाही ठीक आहे”, असं ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!