तब्बल १९ लाखांची दारू जप्त

तब्बल १९ लाखांची दारू जप्त

*कोकण Express*

*तब्बल १९ लाखांची दारू जप्त…!*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

होळी उत्सव दोन दिवसांवर आलेला असताना या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा येथून महाराष्ट्रात बेकायदा नेली जात असलेली तब्बल १९ लाखांची गोवा बनावटीची अवैध दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या पथकाकडून जप्त करण्यात आली. या प्रकरणी गणेश सुभाष पाटील (४५, राठी देवपूर, धुळे ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी रात्री ११.४५ वाजता इन्सुली सात जांभळी सावंतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई केली आहे.

या कारवाईत १९ लाख २० हजार रूपये किमतींची गोवा बनावटीची दारू व रुपये १० लाख किमतीचा टेम्पो असा एकूण २९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर आरोपीच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करता आरोपी व मुद्देमाल सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा निवेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, गुरुनाथ कोयंडे, पोलीस नाईक अमित तेली, रवी इंगळे, यशवंत आरमारकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!