*कोकण Express*
*आंगणेवाडी येथे ४ मार्च रोजी सार्वजनिक पूजा*
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे ४ मार्च रोजी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांची सार्वजनिक पूजा संपन्न होणार आहे.सायं. ६.०० वा. पूजा, सायं. ७.३० वा. – आंगणे कुटुंबीयांचे सुस्वर भजन, सायं. ८.३० वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद रात्री १०.०० वा. प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे, (शाखा डोंबिवली) यांचे ‘गणेश महिमा’ हे पौराणिक दशावतार नाटक होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.