*कोकण Express*
*भाजपच्या वतीने उद्या आचऱ्यात बूथ सक्षमीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण तालुका भाजपच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता आचरा येथील जामडूल रिसॉर्ट येथे बूथ सक्षमीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजन तेली, बूथ सशक्तीकरण अभियानप्रमुख महेश सारंग उपस्थित राहणार आहेत.
तरी यावेळी मालवण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शक्ती केंद्रप्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद प्रभारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.