*दहावी परीक्षांसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्थाची करण्यात आली सोय…*
*वेंगुर्ला ःःप्रतिनिधी*
१० वी SSC बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. परिक्षा केंद्रापासून दुर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थांना वेळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागते. काहीवेळा एसटी, गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. हे रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी गावागावात वाहनाची व्यवस्था करून त्यांना परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली. शेवटच्या पेपर पर्यंत ही सेवा दिली जाणार असून आज स्वतः अर्चना घारेंनी परिक्षा केंद्रावर जात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.