फणसगाव महाविद्यालय येथे नोकरी भरती मेळावा संपन्न

फणसगाव महाविद्यालय येथे नोकरी भरती मेळावा संपन्न

*कोकण Express*

*फणसगाव महाविद्यालय येथे नोकरी भरती मेळावा संपन्न*

*कासार्डे ; संजय भोसले*

फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव व आय सी आयसी आय बँक आणि एन आय आय टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता तसेच पंचक्रोशीतील पदवीधर विद्यार्थ्यांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील नोकरीची उपलब्धता करून देऊन मुंबई व पुणे शहरातील नोकरीचे अवलंबित व कमी करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात महाविद्यालयीन व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आय सी आयसी आय बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजर या पदाकरिता मुलाखती दिल्या. या मुलाखतीकरिता आय सी आयसी आय बँकेचे असिस्टंट मॅनेजर श्री पंकज टिळवे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात दीप प्रज्वलन ,कार्यक्रमाचे उद्घाटन करून तसेच या कॅम्पस इंटरव्यू याची माहिती दिली गेली. दुसऱ्या सत्रात प्रत्यक्ष मुलाखती लेखी व तोंडी पद्धतीने घेण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभावी प्राचार्य मा.सौ. अनुश्री उमेश नारकर यांनी मुलांना मुलाखतीकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जोशना कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!