*कोकण Express*
*फणसगाव महाविद्यालयात युवा महोत्सव उत्साहात साजरा*
*कासार्डे ; संजय भोसले*
फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था, मुंबई संचलित
कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव मध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करून तृतीय वर्षातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी क्रीडा विभागाच्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळणारे विद्यार्थी सांस्कृतिक विभागामार्फत घेतल्या गेलेल्या पोस्टर रांगोळी यासारख्या विविध स्पर्धा N.S.S. आदर्श विद्यार्थी/ विद्यार्थिनी आजीवन विभागचे आदर्श विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव मा. श्री. प्रभाकर नारकर अध्यक्ष म्हणून संस्थेचे सदस्य संस्था सदस्य माननीय श्री महेश नारकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप विठ्ठल नारकर बाबू कृष्णकांत आडिवरेकर, महेश पडवळ आणि फणस गावच्या सरपंच मा. श्रीम. सायली कोकाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य, गायन, यासारख्या विविध कलागुण सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीम.अनुश्री नारकर यांनी केले तर विविध विभागाचे अहवाल वाचन प्रा. जान्हवी नारकर यांनी केले आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रभाकर नारकर यांनी डिजिटल महाविद्यालय करण्याकरता सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. श्री. संतोष चव्हाण यांनी संस्थेची 1980 पासून सर्व माहिती सांगून संस्थेच्या दैदिप्य मान यशाचे वर्णन केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनुरुद्र नारकर, माननीय श्री शशिकांत मांजरेकर उपाध्यक्ष आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे मा.श्रीम. ज्योस्त्ना कदम तर आभार प्रदर्शन प्रा. केतकी पारकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक व प्राध्यापके तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले