आपण देशासाठी काहीतरी करायला हवे अशी भावना प्रत्येकाकडे हवी : तहसीलदार आर. जे. पवार

आपण देशासाठी काहीतरी करायला हवे अशी भावना प्रत्येकाकडे हवी : तहसीलदार आर. जे. पवार

*कोकण Express*

*आपण देशासाठी काहीतरी करायला हवे अशी भावना प्रत्येकाकडे हवी : तहसीलदार आर. जे. पवार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई – गोवा महामार्ग व कणकवली कोल्हापूर राज्य मार्ग जातात त्या हुबरट गावात शनिवारी ग्रामपंचायतच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी पत्रकार व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कणकवली कोल्हापूर या राज्य मार्गावर हुंबरठ तीठा ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रस्ता प्लास्टिक मुक्त केल्यामुळे या रस्त्यावरील प्रवास आता आनंददायी बनला आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग असो किंवा जिल्ह्यातील राज्यमार्ग असो या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या व इतर कचरा साठलेला आहे. या कचऱ्यामुळे रस्त्याचा आजूबाजूचा परिसर खूपच विद्रूप दिसतो. जिल्ह्यात अनेक रस्त्यांची अवस्था सध्या तशी आहे. यावर मार्ग म्हणून हूमरट ग्रामपंचायत तिने पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेसाठी सरपंच मनीषा गुरव, उपसरपंच संदीप होळकर , ग्रामसेवक व्ही व्ही ठाकूर ग्रामपंचायत सदस्य सुयोग माणगावकर, मोहन गुरव, रिया पांचाळ, सुचिता दळवी यांनी पुढाकार घेतला होता.

विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये कणकवलीचे तहसीलदार आर चे पवार, पत्रकार गणेश जेठे, पत्रकार महेश सरनाईक, बाजीराव काशीद करूळ सरपंच समृद्धी नर ग्रामपंचायत सदस्य सौ चव्हाण, मंडल निरीक्षक नीलिमा प्रभू देसाई, तलाठी योजना सापळे, लिपिक सुनील गुरव गणेश गुरव, निकिता बागवे लक्ष्मी खांदारे स्मिता गुरव रेश्मा बागवे कोमल चव्हाण आशा स्वयंसेविका प्रियंका पांचाळ प्रिया पांचाळ तसेच गुणाजी गुरव, गीता शिरोडकर, प्रज्ञा गुरव, विनायक सावंत, बाबाजी गुरव, लवू गुरव, मंदा दळवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शनिवारी सकाळी नऊ वाजता तहसीलदार आर जे पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गाऊन या मोहिमेला सुरुवात झाली. ग्रामसेवक ठाकूर यांनी ही स्वच्छता मोहीम का राबवली जात आहे याचे महत्त्व सांगितले.

तहसीलदार आर जे पवार यांनी आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवे अशा भावना प्रत्येकाकडे असल्या पाहिजेत. देशाच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या गावासाठी स्वच्छता मोहीम राबवली तर आपोआपच देशाची सेवा देखील होते. हुंबरठ गावातील ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने एकत्र येत गावातून जाणारा रस्ता स्वच्छ केला. याच हुंबरठ गावचा आदर्श घेऊन इतर गावातील ग्रामस्थांनी ही आपल्या गावातून जाणारे रस्ते प्लास्टिक मुक्त करावेत असे आवाहनही तहसीलदार आरजे पवार यांनी केले. उपसरपंच संदीप शेळके यांनी यापुढेही स्वच्छता मोहीम आमच्या गावात सुरू ठेवू असे सांगितले.

हुंबरठ तीठा येथून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेले सर्व प्लास्टिक बाटल्या व इतर प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्यामुळे हा मार्ग खूपच स्वच्छ झाला आहे. येणारे जाणारे वाहन चालक ही या मोहिमेमुळे समाधान व आनंद व्यक्त करत होते. यापुढे पूर्ण गाव प्लास्टिक मुक्त कसा होईल या दृष्टीने आपण मोहीम राबवणार आहोत असे सरपंच मनीषा गुरव व ग्रामसेवक ठाकूर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!