कुणकेश्वर यात्रौत्सव काळात देवगड आगाराला ७ लाख २९ हजार ६६७ एवढे उत्पन्न

कुणकेश्वर यात्रौत्सव काळात देवगड आगाराला ७ लाख २९ हजार ६६७ एवढे उत्पन्न

*कोकण Express*

*कुणकेश्वर यात्रौत्सव काळात देवगड आगाराला ७ लाख २९ हजार ६६७ एवढे उत्पन्न…*

*चालक सेवेत पी. एल.शिंदे,वाहक पी.पी.शिंदे  पतीं पत्नीच्या जोडीने सलग २२ फेऱ्या मधून २२ हजार २३२ एवढे उत्पन्न*

*देवगड, ः प्रतिनिधी*

दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सव काळात देवगड आगाराने तालुक्यातील ग्रामीण भागातून २८ गाड्यांद्वारे विशेष प्रवासी सेवा देत एकूण एकूण १६.२१४ किमी ४७१ प्रवासी फेऱ्या तुन २२ ५५५ प्रवाश्यांची सेवा करून रु७,२९,६६७/- एवढे उत्पन्न सवलत मुल्यासह प्राप्त केले ग्रामीण यात्रा फेरी बरोबर देवगड आगारातून बोरीवली, पुणे,बेळगाव या बरोबर कणकवली,नांदगाव रेल्वे स्थानक यामार्गावर यात्रौत्सव काळात जादा प्रवासी फेऱ्यामधून एवढे उत्पन्न प्राप्त केले.
सन २०२० च्या यात्राउत्सव काळात ६३५ फेऱ्यांमध्ये रु ६,१४,०१५/एवढे उत्पन्न होते .त्या तुलनेत २०२३ च्या यात्रा उत्सव काळात देवगड आगाराने अधिक उत्पन्न मिळविले.
देवगड आगारातून सर्वाधिक उत्पन्न आणण्याचा मान चालक ए.के.इंदप,वाहक व्ही. आर.सावंत यांनी मिळविला त्यांनी १७ फेऱ्यांद्वारे ९०२ किमी अंतरात रु ४२००४/एवढे उत्पन्न आणले.तर दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न चालक एस.यु.बटवाले,-वाहक जे. एस.ढबाले,यांनी २६ फेऱ्या ९६७ किमी.मधून रु ४१६२९/-उत्पन्न,चालक डी.डी. जंगले,वाहक एस.के.पवार यांनी २६ फेऱ्या ९९१ किमी द्वारे रु ३२,८४२/-,चालक ए.एल.इंदप वाहक एस.एस.साटम या जोडीने २२ फेऱ्या ९२४ की मी द्वारे रु ३१,६०५/- उत्पन्न आणले .चालक एस.सी.माळवदे,वाहक एस.एस.कोकरे यांनी ३१ फेऱ्या ,८११ किमी मधून रु २९०२६ /-एवढे उत्पन्न आणले.पहिल्या पाच क्रमांक उत्पन्न या जोडीने मिळविले.
या व्यतिरिक्त अन्य सर्व चालक वाहक यांनी प्रवासी वर्गाशी सौजन्याने वागून सुरक्षित व जलद सेवा दिली.
देवगड आगारात चालक सेवेत पी. एल.शिंदे व वाहक सेवेत त्यांची पत्नी पी.पी.शिंदे(पूर्वाश्रमीची पी. यु.मुणगेकर )या सेवा बजावीत असून त्यांनी यात्रौत्सव काळात यात्रेकरूंची सेवा करीत असताना या पतीं पत्नीच्या जोडीने सलग २२ फेऱ्या मधून ३३० किमी अंतरात रु २२२३२/- एवढे चांगले उत्पन्न देवगड आगारास प्राप्त करून दिले व विशेष कामगिरी बजावली.
सिंधुदुर्ग रापम विभाग नियंत्रक प्रशांत वासकर ,विभागीय वहातुक अधिकारी विक्रम देशमुख,उपयंत्र अभियंता श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत
सैतावडेकर,सहा.वहातुक निरीक्षक लवू सरवदे,यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वहातुक नियंत्रक,कार्यशाळा अधिक्षक कार्यशाळा कर्मचारी ,वाहन
परिक्षक,तसेच लेखाधिकारी,लिपिक,चालक वाहक या सर्वांनी यात्रोत्सव यशस्वीपणे पार पडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!