*वैश्य समाजामुळे संदेश पारकर हे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पोहोचलं*

*वैश्य समाजामुळे संदेश पारकर हे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पोहोचलं*

*कोकण Express*

*वैश्य समाजामुळे संदेश पारकर हे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पोहोचलं*

वैश्य समाज कणकवली तालुक्याच्या वतीने समाजातील सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,यांचा आज समाजाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्कार सोहळ्यासाठी सत्कारमूर्ती तालुक्यातून उपस्थित होते, यावेळी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,

कणकवली तालुका वैश्य समाज समाजाचा मी मनापासून कौतुक करतो की, वैश्य समाजाने स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे.
या तालुक्यांमध्ये कशा पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये आपला समाज अशा पद्धतीने चांगलं काम उभा करतोय स्वतःचं नेतृत्व ,कर्तृत्व सिद्ध करतो आहे. आणि त्याचबरोबर जनतेने सुद्धा ते त्यांना स्वीकारलेला आहे. अशा प्रकारचे नेतृत्व हे तालुक्यामध्ये वैश्य समाजाचा नेतृत्व उभ होत आहे. आणि या वैश्य समाजाला शोधण्याचं काम त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम त्यांना संघटनेमध्ये संघटित करून एकत्रित करून त्याला बोलवण्याचे काम माझ्याकडून तालुक्याच्या वैश्य समाजाने केलं आणि म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी आभार मानतो. आज सत्कार आपला होतोय ज्या निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सरपंच,उपसरपंच सत्कार करतोय ही कणकवली तालुका वैश्य समाजाने दिलेल्या पाठीवर कौतुकाची थाप आहे. या कौतुकातून समाजाने प्रेरणा घेतली पाहिजे माझ्या कर्तुत्वाची दखल माझ्या वैश्य समाजाच्या नेतृत्वाने घेतली. आणि त्यांनी माझा सन्मान केला त्यामुळे वैश्य समाजाने तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. आणि भविष्यामध्ये आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये आपण अशाच प्रकारचं यश प्राप्त करावं असं वर्ष समाजाचं पुढच्या वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा आहेत.

मी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तितकच ताकतीने वर्ष समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला मागील काळामध्ये ज्येष्ठांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली म्हणून संदेश पारकर यांच्या नेतृत्व कणकवली ते महाराष्ट्र पर्यंत पोहोचलं याच्यामागे वैश्य समाजाचे मोठे आशीर्वाद, ताकत समाजाची मिळाली म्हणून मी घडलो वैश्य समाज एवढ्या मोठ्या संख्येने असताना सुद्धा आपण आजही दुर्लक्षित आहोत आपण जर संघटित राहू तर आपल्याला न्याय मिळणार आहे असं प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी सत्कार समारंभ कार्यक्रमांमध्ये केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!