कनेडी राड्यातील संशयित आरोपींना जामीन मंजूर

कनेडी राड्यातील संशयित आरोपींना जामीन मंजूर

*कोकण Express*

*कनेडी राड्यातील संशयित आरोपींना जामीन मंजूर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील कनेडी येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील राड्या प्रकरणातील १० अटकेतील आरोपींना अखेर तब्बल १७ दिवसांनी सशर्थ १५ हजाराचा जामीन मंजूर झाला आहे.

कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्याल्यानंतर या आरोपींना जामीन मंजूर झाला नव्हता.अखेर शुक्रवारी प्रत्येकी १५ हजारांचा सशर्थ जामीन मंजूर झाला. यामध्ये ३०७ च्या गुन्ह्यातील कुणाल सावंत, योगेश वाळके, योगेश सावंत तर ३५३ च्या गुन्ह्यांमधील संतोष आंग्रे, संदीप गावकर, अनिल पांगम, तुषार गावकर व ३०७ च्या दुसऱ्या गुन्ह्यात श्रीकांत सावंत, निखिल आचरेकर, राजेश पवार यांना अटक करण्यात आले होते. यातील संदीप गावकर याला ३०७ च्या गुन्ह्यात पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते. तर मंगेश सावंत याला ३५३ च्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले होते. या संशयीत आरोपींना ७ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना आज तब्बल १७ दिवसांनी सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला.

दोन्ही गटाच्या संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत , ऍड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. साक्षीदारांवर दबाव न आणणे, तपास कामात सहकार्य करणे आदी अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, बापू खरात करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!