*कोकण Express*
*भारतीय जनता युवा मोर्चाचा २८ फेब्रुवारीला मालवणात मेळावा*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवनच्या सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे युवकांना मार्गदर्शन करताना स्वयंरोजगाराच्या दिशा आणि नव्या शैक्षणिक धोरणातील बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिली आहे.
स्पर्धात्मक युगात युवकांना स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत. केंद्रिय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून अनेक रोजगारांना सबसिडी उपलब्ध असून याची सविस्तर माहिती या मेळाव्यातून दिली जाणार आहे. तसेच शैक्षणिक धोरणातील नवीन बदल याबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार आहेत. तरी या मेळाव्याला युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.