*कोकण Express*
*वैभववाडीत स्टॉल हटाव मोहिमेला सुरुवात*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी शहरात स्टॉल हटवण्याची धडक मोहीम नगरपंचायतने सुरू केली आहे. हटविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज कांबळे रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे वातावरण तणावाचे झाले आहे.
सकाळी 11 वाजता या मोहिमेला सुरुवात झाली होती. परंतु स्टॉलधारकानी आक्रमक पवित्रा घेत विरोध केला होता. मात्र मुख्याधिकारी स्टॉल हटविण्यावर ठाम राहिले होते. मुख्याधिकाऱ्यांनी दोन तास मुदत दिली होती. स्टॉलमधील साहित्य बाजूला करा. हटाव मोहीम ही होणारच आहे. असे सांगितले. त्यानुसार 3 वा.पासून स्टॉल हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे. यावेळी नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, राजन तांबे, निकम, यामिनी वळवी, स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत व नगर पंचायत अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.