*कोकण Express*
*महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी सदानंद रावराणे यांची निवड*
सहसंपादक/नवलराज काळे-: मुंबई येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा मिलिंद विद्यालय पवईचे अध्यक्ष, उद्योजक, वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र सदानंद दत्ताराम रावराणे यांची महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे ज्युनिअर कॉलेजच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रावराणे हे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घकाळ असलेले योगदान व अनुभव लक्षात घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली. रावराणे यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.