मालवण शहरातील ३१ विकास कामांसाठी ६ कोटी ५२ लाख निधी मंजूर

मालवण शहरातील ३१ विकास कामांसाठी ६ कोटी ५२ लाख निधी मंजूर

*कोकण Express*

*मालवण शहरातील ३१ विकास कामांसाठी ६ कोटी ५२ लाख निधी मंजूर*

*मालवण  प्रतिनिधी*

महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान योजना २०२२/२३ अंतर्गत भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत मालवण शहरासाठी भरीव विकास निधी उपलब्ध झाला आहे.

मालवण शहरातील ३१ विकास कामांसाठी ६ कोटी ५२ लाखाची कामे मंजूर करून जिल्हा नियोजन कडून निधी उपलब्ध करून घेतला आहे. याबाबत माहिती मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिली असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!