*कोकण Express*
*गांगोवाडी येथील गांगोमंदिर समोरील रस्त्यावरील माती केली साफ*
*नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या आदेशावरून नगपंचायत कर्मचाऱ्यांनी केले काम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली गांगोवाडी येथे गांगोमंदिर समोर पावसाळ्यात खडी व माती खाली वाहून रस्त्यावर आल्यामुळे एका जागीच ती माती बसल्यामुळे लोकांना चालत जाताना व वाहनांसाठी मोठी समस्या निर्माण झाली. तरी या गोष्टींचा त्रास तेथील स्थानिक नागरिकांना होत होता.
तरी ही गोष्ट नगराध्यक्ष समीर नलावडे यांना समजताच त्यांनी तात्काळ नगरपंचायतीचे कर्मचारी पाठवून ती खडी व माती तेथून काढण्यात आली. या कामाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.