कणकवलीतील रिक्षाचालक भालचंद्र आचरेकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी केला विशेष गौरव

कणकवलीतील रिक्षाचालक भालचंद्र आचरेकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी केला विशेष गौरव

*कोकण Express*

*कणकवलीतील रिक्षाचालक भालचंद्र आचरेकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी केला विशेष गौरव*

*कासार्डे ; संजय भोसले*

कणकवलीतील रिक्षाचालक भालचंद्र आचरेकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कणकवली पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी भालचंद्र आचरेकर यांचा पटवर्धन चौक कणकवली येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि विशेष कौतुकही केले.

१६ फेब्रुवारी रोजी श्रीधर नाईक चौक येथे पडलेले पैशाचं पाकीट ऑटो रिक्षा स्टॅन्ड क्रमांक पाच या ठिकाणी रिक्षा चालक भालचंद्र आचरेकर यांना मिळाले होते.त्यांनी मालक ॲलेक्स डिसील्व्हा यांचा शोध घेऊन यांना ते प्रामाणिकपणे परत केले होते.त्या पाकिटमध्ये महत्त्वाचे कागदपत्र पत्र व काही रक्कम होती.रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले जात होते.कणकवली वाहतूक पोलीसांनी देखील या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणा बद्दल त्याची भेट घेऊन पाठीवरील कौतुकाची थाप दिली.

त्यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे अध्यक्ष संतोष नाईक, रिक्षाचालक मंगेश सावंत, संजय सावंत, संतोष सदडेकर, मिलिंद सावंत,विनोद गोसावी,महेश गोसावी,गुरुनाथ मोर्ये अन्य रिक्षाचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!