वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर येथुन वनविभागाने जेरबंद केलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू

वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर येथुन वनविभागाने जेरबंद केलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू

*कोकण Express*

*वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर येथुन वनविभागाने जेरबंद केलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू…*

*बिबट्याला फसकीमुळे अंतर्गत शारीरिक दुखापत झाल्याने त्याचा उपचार दरम्यान आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत्यू…*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

तालुक्यातील अणसुर येथील संजय गावडे यांच्या बागेमध्ये काल मंगळवार २९ डिसेंबर रोजी सायंकाळी शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये एक बिबट्या अडकलेल्या स्थितीत आढळला होता. वनविभागाने वेळेत घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्या जखमी बिबट्याला पिंजर्‍यात पकडले होते. परंतु त्या बिबट्याला फसकीमुळे अंतर्गत शारीरिक दुखापत झाल्याने त्याचा उपचार दरम्यान आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.वेंगुर्ले अणसुर घाटी माथ्यावरील संजय गावडे यांच्या बागेत बिबट्या फासकीत अडकला होता. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संजय गावडे बागेत गेले असता त्यांच्या अवघ्या पाच फुट अंतरावर बिबट्याने डरकाळी फोडली. मात्र बिबट्या फासकी त अडकला असल्याने गावडे धोक्यातून वाचले होते.तात्काळ त्यांनी पोलीस पाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण, कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल चिरमे, नेरूर वनपाल कोळेकर, मठ वनरक्षक व्ही.एस.नरळे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पिंजऱ्यात पकडले. यावेळी संजय गावडे यांच्यासह पोलिस पाटील तसेच ग्रामस्थ आनंद गावडे, राजेश गावडे, परशुराम तलवार, अनिल नवार, सुनील गावडे, राकेश गावडे आदी सहभागी झाले होते.अणसुर येथील बिबट्या (मादी) सुमारे २ वर्षाची होती. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वनविभागाने त्याला पिंजऱ्यात पकडून आकेरी येथील वनविश्राम गृहावर नेले. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी अमृत शिंदे हे उपचार करीत होते. फसकीत अडकलेल्या तिला खूप त्रास होत होता. सकाळ पर्यंत बिबट्याची तब्बेत ठीक होईल असे वाटत होते मात्र आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मृणाल रेवटी हिने शवविच्छेदन केले त्या नंतर आकेरी येथील शासकीय वनविभागाच्या जमिनीमध्ये त्याला वनविभागाने अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती वनरक्षक सावळा कांबळे यांनी दिली._

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!