फोंडाघाट मध्ये शिवसाम्राज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

फोंडाघाट मध्ये शिवसाम्राज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

*कोकण Express*

*फोंडाघाट मध्ये शिवसाम्राज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी*

फोंडाघाट मध्ये एस टी स्टॅन्ड परिसरात गेली ५-६ वर्षे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती साजरी करण्यात येते. त्याच बरोबर इतरहि सामाजिक उपक्रम हि समाजसेवी संस्था नेहमीच राबवत असते.
त्यामध्ये मागील २ वर्षांपूर्वी आलेला महापूर असो अथवा गड-किल्ले स्पर्धा, गड किल्ले परिसर साफसफाई, रक्तदान शिबीर अश्या विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.
यावर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करताना मूर्ती पूजन व दीप प्रज्वलन याने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नूतन सरपंच सौ. आग्रे मॅडम, राजन चिके, पिंटू पटेल, राजन नानचे, शेखर लिंग्रस, प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन नाकाडी, जयेश सावंत, दिपक इस्वलकर, साहिल डोर्ले, सचिन जामदार, इतर प्रतिष्ठान चे सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मंडळाच्या कार्याची स्तुती करत कौतुकाची शाब्बासकी दिली. अश्या प्रकारचे उपक्रम राबवून महाराजांचा इतिहास समाजासमोर व नवीन पिढी समोर ठेवून प्रतिष्ठान ने आदर्श निर्माण केला आहे. व यापुढेहि हे कार्य आपण चालू ठेवावे असे गौरवोद्गार राजन चिके यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार श्री दिपक इस्वलकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!