*कोकण Express*
*सोमास्थ अकॅडमी कणकवली आणि सिंधुगर्जना ढोल ताशा पथकयांच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित साधून विश्वविक्रम उपक्रमाचे आयोजन*
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल, सोमास्थ अकॅडमी कणकवली आणि सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दी.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी कणकवली येथे विश्वविक्रम उपक्रम घेण्याचे योजले आहे.यामध्ये १००० पालक व विद्यार्थी यांचा संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच वेळी वाजवण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या वाद्यामध्ये ( ढोल, ताशा, तबला , पेटी, ढोलक, मृदुंग, टाळ, हलगी, दिमडी, ई. वाद्यांचा समावेश आहे.) व त्याचबरोबर उर्वरित विद्यार्थी डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती तयार करून एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत.या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होईल व यासाठी सर्व सहभागी स्पर्धकांना वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र दिले जाईल.तरी या उपक्रमात सर्व शाळेच्या शिक्षकांनी,विद्ध्यार्थ्यानी व पालकांनी याची नोंद घेऊन यामध्ये जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा असे आवाहन आयडियल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमातील सहभागासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
८६०५०५५०७६,७६६६४९५८७०
९०८२६६९८११,८००७८५०५९३
७०५७२९२९८५,९३५९१९३६५९
28 फेब्रुवारी 2023 रोजी कणकवली येथे होणाऱ्या वर्ल्ड रेकॉर्ड च्या कार्यक्रमांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी लगेचच मला नावे कळवा ……या कार्यक्रमांमध्ये हार्मोनियम, तबला, पखवाज, टाळ,लेझीम,कीबोर्ड, अशा प्रकारची वाद्य वाजवायची आहेत …. त्याचप्रमाणे मानवी मनोरा द्वारे डॉक्टर अब्दुल कलाम यांचे चित्र तयार करायचे आहे …..या कार्यक्रमांमध्ये हार्मोनियम आणि कीबोर्ड वाजवण्यासाठी सहा गाणी तयार करायची आहेत ….कार्यक्रमातील गाणी मी आपल्याला पाठवीन ……त्याच गाण्यांवर तबला, पखवाज, टाळ, ढोल यांचे वादन होईल …..तबल्यावर वाजवला जाणारा ताल अत्यंत सोपा आहे …..या कार्यक्रमात सहभागी झाल्यास आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल चे एक सर्टिफिकेट देण्यात येईल …..या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे …
गायन मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा गाणी गायन करायची आहेत ….
तरी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लगेचच आपली नावे कळवा ….त्यामुळे त्याच दिवशी आपल्याला सर्टिफिकेट मिळण्यास मदत होईल ….
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे …..
संदीप पेंडुरकर …
कणकवली
9423302774