हेल्प अकॅडमी’ चा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

हेल्प अकॅडमी’ चा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

*कोकण Express*

*हेल्प अकॅडमी’ चा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम…*

*फोंडघाट ःःप्रतिनिधी* 

‘तुम्हाला काही मदत हवी आहे का?’ तर आम्ही आहोत….. हे ब्रीद वाक्य आहे हेल्प अकॅडमी फोंडाघाटचं. सर्वसामान्य गरजुंना मदत करणारी ही अकादमी आहे. फोंडाघाट सारख्या दुर्गम आणि घाट रस्ता असणाऱ्या गावात काही युवकांनी ह्या अकॅडमी ची स्थापना केली. आणि आज पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक वाटसरूच ठरली. कोणाच्या घरी साप येवो किंवा कोणाच्या वाहनाला घाट रस्त्यात बिघाड होवो, चिंता करायची गरज नाही. मदती साठी आम्ही आहोत ना? हे सातत्य ठेवलं ते फोंडाघाट च्या ‘हेल्प अकादमी’ ने.

आज याच अकादमीने स्तुत्य उपक्रम राबवत फोंडाघाट तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करून दिलीय. सध्या राज्यात बारावी परीक्षेचे पेपर सुरू झाले. त्यासाठी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट मध्ये परीक्षा केंद्र देखील जाहीर झाले. या दरम्यान या फोंडाघाट पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना एसटी अभावी गैर सोय होऊ नये यासाठी पुन्हा एकदा हेल्प अकादमी ग्रुप सज्ज झालाय. बारावी आणि दहावी च्या विद्यार्थ्यांना पेपर ला पोहोचताना कोणत्याही प्रकारची वाहना अभावी गैरसोय होऊ नये यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या निशुल्क सेवेसाठी हेल्पलाईन no जाहीर केले. मदतीसाठी महेश सावंत- 8698981919, सिद्धेश पावसकर – 9421149523, संजय नेरूरक- 9423300550, हेमराज तिरोडकर – 7218412477,ओंकार पिळणकर -9325512052 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन हेल्प अकादमी चे संस्थापक महेश सावंत यांनी केलं आहे. हेल्प अकादमी च्या या स्तुत्य उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!