*कोकण Express*
*देवगड बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देवगड येथे फटाक्यांची आतषबाजी*
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला देण्याचा निर्णय दिल्याने देवगड बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देवगड एसटी स्टँड आणि जामसंडे बाजार पेठ येथे तसेच तालुक्यात ठीक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणा देत जल्लोष साजरा केला.
शिवसेना पक्षावरून उद्धव ठाकरे व शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आज रात्री ८ वाजता देवगडतील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देवगड एसटी स्टँड आणि जामसंडे बाजार पेठ येथे तसेच तालुक्यात ठीक ठिकाणी जमत फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला. हर हर महादेव… बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… शिवसेनेचा विजय असो… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
देवगड येथील बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुका प्रमुख विलास साळसकर ,अमोल लोके तुषार पेडणेकर व अन्य कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला