*कोकण Express*
*केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कुडाळ शिवसेनेच्या वतीने जल्लोषी स्वागत*
*’धनुष्यबाण’ निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शिवसेनेकडून जल्लोष*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शिवसेना शिंदेंचीच असा निर्णय केंद्रीय आयोगाकडून देण्यात आल्यानंतर कुडाळ शिवसेनेकडून त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर , तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर , उप ता. प्र. करलकर , पुंडलीक जोशी, अगरवाल, रामकृष्ण गडकरी, जयदीप तुळसकर, अनिरुध्द गावडे, सिद्धेश मोंडकर , अनिकेत अगरवाल, सिताराम चव्हाण, अनिल वरावडेकर, भरत चव्हाण, रघुनाथ साधले आदि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.