*कोकण Express*
*कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून कुत्रा मालक कधी होत नाही..*
*रावण धनुष्य पेलवू शकत नाही,तो छाताड्यावरच बसेल असा टोला शिवसेना नेते खा.संजय राऊत लगावला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आता निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे.पक्ष म्हणजे काय ? पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मोदी, शहाच्या कृपेने चोर, दरोडेखोराना निवडणूक आयोगाने दिले आहे.देशात घटना,कायदा आणि सर्व नियम पायदळी तुडवून हा निर्णय घेतला गेला.ही लोकशाहीची व्याख्या नाही.ठीक आहे,दोन दिवस फटक्यांची आतषबाजी होईल.सगळे विषय खोख्यामध्ये होत आहेत. काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, खचलो नाही,आम्ही शिवसैनिक खचनार नाही.उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत.भाकरी पळवली, म्हणून कुत्रा मालक होऊ शकत नाही.रावण धनुष्य पेलवू शकत नाही,तो छाताड्यावरच बसेल असा इशारा शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी दिला आहे.
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी आ.वैभव नाईक,माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत,संदेश पारकर,उपनेते गौरीशंकर खोत,नगरसेवक सुशांत नाईक, आप्पा पराडकर,अतुल रावराणे,संजय पडते,राजू शेट्ये आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
खा.संजय राऊत म्हणाले,मी कोकणात आहे,एकटा कणकवलीत आलो,कोकणात शिवसेना जागच्या जागी आहे.निवडणूक आयोगातील पोपटपंची दिसली आहे.त्या निकालाने काहीजण आनंद लुटत आहेत. मी काही फोटो पाहिलेत,मोजून ७ चेहरे दिसत होते.बेगामी शादी में अब्दुला दिवाना दिसत आहेत.तुमचा काहीही संबंध नाही.विनाकारण उड्या मारु नका. शिवसेना पक्ष संपविण्यासाठी सुड उगवला जात आहे.लोकशाहीच्या नावाने राजकीय हिंसाचार झाला आहे .हिम्मत असेल तर निवडणुका घ्या,शिवसेना कोणाची? फैसला लोकांना घेऊ द्या,असे आव्हान खा.संजय राऊत यांनी दिले आहे.
कालच्या निकालानंतर समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.जरा बघा आणि नंतर ठरवा.पाळीव कुत्र्याने भाकरी पळवली, म्हणून कुत्रा मालक होऊ शकत नाही,हे लक्षात ठेवा.जरी रावणाच्या चिन्ह मिळालं तरी रावण धनुष्य पेलवू शकत नाही.तो त्यांच्या छाताड्यावर बसेल.आमदार, खासदार शिवसेनेकडे आहेत. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत.कोणत्याही सभागृहात दिसणार नाहीत.राज्यातील जनतेमध्ये भावनिक वातावरण आहे.चीड निर्माण झाली आहे.पश्चिम बंगाल मध्ये मोदी – शहा यांनी असेच वातावरण केलं होते.त्यावेळी जनतेने भाजपला जागा दाखवलेली आहे,असा टोला खा.संजय राऊत यांनी लगावला.
हा राज्यात भाजपने खेळ सुरु केला.मिंदे गट आणि शिवसेना अशी लढाई नाही.त्यामागे महाशक्ती विरुद्ध आमची लढाई आहे.ज्या पद्धतीने सुडाचे राजकारण केलं जातं आहे.कळसूत्री बाहुल्या मुख्य पदावर आपली माणसे ठेवून आपल्याला हवा तसा निर्णय करून घेतले जात आहेत.न्याय, व्यवस्था आणि सर्वच पदांवर नियुक्ती केली जात आहे.हा निर्णय झाला तरी पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही वेगाने पुन्हा उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली भरारी घेऊ,असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
आमच्यावर कोणताही दबाव टाकला तरी झुगारून आम्ही उभारी घेऊ, सर्व खासदार आमच्या सोबत आहे.निवडणूक आयोगाच्या निकालानंतर कुंपणावर आहेत त्यांनी उड्या मारा.जमिनीवर शिवसेना होती ती आमच्यासोबत आहे.त्यामुळेच हे आमदार आणि खासदार झाले आहेत.उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत.निवडणूक आयोगाने शेन खाल्ल म्हणजे काय ?शिवसेना भवन आमचेच आहेत.शाखा आणि शिवसैनिक आमचे आहेत.फक्त भाजपने शिवसैनिकांमध्ये डोकी फोडून रक्त साडण्यासाठी हि चाल खेळली आहे.निवडणुका घ्या कोण आहेत ते? लोक ठरवतील.शिंदे गट कोण त्यांनी त्यांचं पाहावं,चिन्ह आणि पक्ष देण्याचे दिल्लीतून आधीच ठरले.हर कुत्ते की दिन आते है,तसच झालं आहे,असेही खा.राऊत यांनी सांगितले