श्री देव कुणकेश्वराचे आमदार नितेश राणे यांनी सपत्नीक घेतले दर्शन

श्री देव कुणकेश्वराचे आमदार नितेश राणे यांनी सपत्नीक घेतले दर्शन

*कोकण Express*

*श्री देव कुणकेश्वराचे आमदार नितेश राणे यांनी सपत्नीक घेतले दर्शन*

श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्र यात्रोत्सवानिमित्त आमदार नितेश राणे यांनी सपत्नीक श्री देव कुणकेश्वराची रात्री २ वाजता विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत सौ. ऋतुजा नितेश राणे, चि. निमिष नितेश राणे उपस्थित होते. श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आमदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिर कॉरिडोअरचा विकास करावा, अशी मागणी अलीकडेच आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भेट घेऊन केली आहे. दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेले श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान, देवगड जि. सिंधुदुर्ग येथील परिसरातील सर्वांगीण विकास व्हावा. पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे तसेच मंदिर परिसर सुशोभिकरण करणे गरजेचे आहे, तसेच पर्यटन दृष्ट्या गावच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी मिळावा अशी मागणी भाजपा आ.नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना भेटून केली आहे. त्यावर तातडीने मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!