जिल्हा पोलीस अधीक्षकांची सटमटवाडी चेकपोस्टवर सरप्राईज नाकाबंदी

*कोकण Express*

*जिल्हा पोलीस अधीक्षकांची सटमटवाडी चेकपोस्टवर सरप्राईज नाकाबंदी*

*बांदा ः प्रतिनिधी*

नववर्ष व वर्षअखेरीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून होणारी अवैध दारु वाहतुक व अंमली पदार्थांची वाहतुक रोखण्यासाठी बांदा सटमटवाडी चेकपोस्टवर कसून तपासणी सुरु आहे. सरप्राईज नाकाबंदी अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी अचानकपणे चेकपोस्टवर भेट देत आढावा घेतला. सर्व गाड्यांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले.

थर्टीफस्ट व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारु, अंमली पदार्थ व ड्रग्ज वाहतुकीची शक्यता लक्षात घेत बांदा सटमटवाडी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी सुरु आहे. आज व उद्या दोन दिवस चेकपोस्टवर सरप्राईज नाकाबंदी करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व डीवायएसपी रोहिणी साळुंखे यांनी चेकपोस्टवर सरप्राईज भेट देत पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत बाँब नाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बनकर व ब्रावो श्वान यांनी वाहनांची तपासणी केली. यावेळी चेकपोस्टवरील अधिकारी व अंमलदार यांना एसपी राजेंद्र दाभाडे यांनी मार्गदर्शन करीत सूचना दिल्या.

यावेळी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव, श्रीमती बाबर तसेच १८ पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!