*कोकण Express*
*इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉनमध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या २५ सायकलस्वारांचा यशस्वी सहभाग*
*रत्नागिरी*
सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने कुडामळमध्ये आयोजित इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन रविवारी (ता. १२) उत्साहात झाली. यामध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या (आरसीसी) २५ जणांनी सहभाग घेत ५० व १०० किलोमीटरची राईड केली. याबद्दल क्लबच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. या सायक्लोथॉनमध्ये बाहेरून जिल्ह्यातून आलेल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक सायकलस्वार सहभागी झाले.
कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले व तेसुद्धा २५ किमी राईडमध्ये सहभागी झाले. या वेळी सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव अमोल शिंदे, इव्हेन्ट चेअरमन शिवप्रसाद राणे, कुडाळ सायकलिंग क्लबचें अध्यक्ष रुपेश तेली, तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, अमेरिका येथील सीरॅक व्ही या तरुणानेही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. सायक्लोथॉनमध्ये एकूण ४०० सायकलपट्टू सहभागी झाले. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र व पदके देऊन गौरविण्यात आले.
रत्नागिरीतून शनिवारी सायंकाळी सायकलस्वार ट्रॅव्हलर गाडीतून कुडाळला रवाना झाले. तिथे सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनने जेवण, राहण्याची चांगली व्यवस्था केली. रविवारी पहाटे राईडला प्रारंभ झाला. ५० किमीसाठी कुडाळ, एमआयडीसी ते वेंगुर्ले व परत तर १०० किमीसाठी मॅरेथॉन कुडाळ एमआयडीसी ते वेंगुर्ले बंदर तेथून केळुस, म्हापण, चिपी विमानतळमार्गे मालवण, चौके, धामापूर, काळसे, नेरुरपार, कुडाळ असा मार्ग होता. तीन-साडेतीन तासांत ५० किमी व ४.४५ ते ६.३० तासांत १०० किमी अंतर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सायकलस्वारांनी कापले. चढाव-उतार, वळणांचे रस्ते, कातळ सड्यावरील रस्ते आणि कुडाळमधील पर्यटनस्थळांना भेटी देत सायकलिंगचा आनंद लुटत अंतर पार केले.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सहभागी सायकलस्वार
५० किमी- मृणाल वाडेकर, मुग्धा सामंत, योगेश सामंत, साहिल पावसकर, शुभम शिवलकर, राकेश होरंबे, संदीप पावसकर, सुहास ठाकूरदेसाई. १०० किमी- धिरज पाटकर, महेश सावंत, दर्शन जाधव, नीलेश शहा, श्रद्धा रहाटे, आरती दामले, लाल्या खातू, एसआर डॉ. नितिन सनगर, एसआर यतीन धुरत, समीर धाटकर, विनायक पावसकर, गजानन भातडे, अमित पोटफोडे, प्रसाद देवस्थळी, योगेश मोरे.