*कोकण Express*
*मतभेद बाजूला करून वैश्य बांधवांनी एकत्र येण्याची गरज*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
समाजात काम करत असताना वैश्य समाजाने नेहमीच पुढाकार घेऊन सामाजिक भान राखले आहे. वृत्ती, कर्तृत्व, दातृत्व म्हणजेच वैश्य समाज. आज समाज संघटित आहे. काही ठिकाणी वैचारिक मतभेदही असतील. परंतु हे मतभेद येणाऱ्या काळात बाजूला सारून समाजासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी केले.
दरम्यान व्यापारी म्हणून समाजात आपल्याला वेगळे स्थान आहे. आपण स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र असे असले तरी आज कित्येक समाज बांधव दुर्बल, दुर्लक्षित राहिले आहेत. अशा समाज बांधवांसाठी समाजाने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. असे आवाहन संदेश पारकर यांनी केले. तेथील आयोजित वैश्य समाज मेळाव्यात बोलत होते.