*कोकण Express*
*वैश्यवाणी समाजाच्या न्यायालयीन लढाईला उपमुख्यमंत्र्यांची राज्य शासनाच्या वतीने सहकार्याची ग्वाही*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आजही वैश्य समाजाला आपण कुठल्या समाजात आहोत हे माहीत नाही वैश्य म्हणजेच वाणी आणि वाणी म्हणजे वैश्य याबाबत आजही खटला सुरू आहे. येणाऱ्या काळात याबाबत हायकोर्टात लढाई लढावी लागेल राज्य शासनाच्या वतीने जे काही सहकार्य पाहिजे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची ग्वाही दिलेली आहे.श्री.तेली आज येथील आयोजित वैश्य समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी बोलताना तेली म्हणाले की आपणही आता या कामाला लागलो आहे. परंतु या कामाचे क्रेडिट उद्या कोणालाही द्या परंतु मध्ये कोणी येऊ नका मध्ये कोण आल्यास इको आडवा येतो आणि हे काम तसेच मागे पडते. जिल्ह्याच्या बाजारपेठात चा विचार करता येथील व्यापारी बांधवांनी बाजारपेठेतील आपले गळे कोणाला दिले आहेत याचा विचार करावा त्यामुळे स्वतः मोठे होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा आज मोपा सीपी या ठिकाणी दिल्लीतील माणसं येऊन बसल्यानंतर आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करावे लागणार त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त शिक्षणावर भर देऊन भविष्यात मोठे होण्याचे स्वप्न बघा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील क वर्ग दर्जाच्या आठ वाचनालयामध्ये एमपीएससी यूपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा लाभ येथील विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि भविष्यात मोठ्या अधिकारी पदापर्यंत मजल मारा आम्ही सर्व न्याती बांधव नक्कीच आपल्या सोबत राहू असे तेली यावेळी बोलताना म्हणाले.