गाबित समाजाने मच्छीमार योजनांचा लाभ उठवावा.. मा.आ.परशुराम उपरकर

गाबित समाजाने मच्छीमार योजनांचा लाभ उठवावा.. मा.आ.परशुराम उपरकर

*कोकण Express*

*गाबित समाजाने मच्छीमार योजनांचा लाभ उठवावा..
मा.आ.परशुराम उपरकर*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

केंद्र व राज्य सरकारने तळागाळातील मासेमारी करून चरितार्थ चालविणाऱ्या मच्छीमारांसाठी अनेक अनुदानाच्या योजना सुरू केलेल्या असून त्याचा लाभ गाबीत समाजातील समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष व माजी आमदार श्री.परशुराम उपरकर यांनी केले आहे.
गाबित समाज वेंगुर्ला येथील समाज बांधवांच्या बैठकीत मा.आ.परशुराम उपरकर यांनी मार्गदर्शन करताना गाबित समाजापूढील अनेक प्रश्नावर आपली भूमिका नि: पक्षपाती ठेवली असून यापुढेही सर्वांनी पक्षाची पादत्राणे बाहेर ठेऊन समाजाचे कार्य पुढे नेण्यासाठी झटले पाहिजे.केंद्र शासनाची मत्स्य संपदा योजना आणि राज्य सरकारची रत्न सिंधू योजना आणि नव्याने जाहीर केलेली अनुदानाची योजना यांचा लाभ गाबित समाजातील लोकांनी घ्यावा.त्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांकडे जावून प्रयत्न करण्यासाठी आपण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी येथे दिले.
यावेळी व्यासपीठावर गाबीत समाज सिंधुदुर्ग संघटनेचे जिल्हा संघटक श्री.चंद्रशेखर उपरकर,नूतन तालुकाध्यक्ष श्री.राजन गिरप ,सचिव श्री .किरण कुबल,उपाध्यक्ष श्री.मसुरकर, महिला मच्छीमार संस्थेच्या जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहा केरकर,उपाध्यक्षा सौ. श्वेता हुले ,जयंत मोंडकर होते.
यावेळी जिल्हा संघटक श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी गाबित समाज,सिंधुदुर्ग संस्थेने आतापर्यंत समाज बांधवांसाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की,आता ही चलवळ प्रत्येक गाबीत बांधवांच्या घरापर्यंत पोचविण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेवून काम केले पाहिजे.वेंगुर्ले तालुकाध्यक्ष श्री.राजन गिरप यांनी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व मच्छीमार गाबित बांधवांना व भगिनींना एकत्र आणून संघटनेला दिशा देण्यासाठी आम्ही सर्व वाड्यातून व गावागावातून सभासद नोंदणी आणि गाबीत संपर्क अभियान राबविणार आहोत.त्यासाठी गाव प्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी विविध गावातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
सौ.स्नेहा केरकर यांनी मच्छीमार महिलांना मिळवून दिलेल्या अनुदान बाबत व प्रश्नांबाबत माहिती विशद केली.शेवटी सचिव श्री.किरण कुबल यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!