तळेरे पंचक्रोशी प्रभागाची संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी झाली

तळेरे पंचक्रोशी प्रभागाची संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी झाली

*कोकण Express*

*तळेरे पंचक्रोशी प्रभागाची संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी झाली*

*हळदी कुंकू समारंभाला विधवा महिलांच्या सहभागाने त्यांचा सन्मान वाढवला*

*कासार्डे ; संजय भोसले*

तळेरे प्रभागात दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी केली जाते. यावेळी विद्यार्थी मनोगत, तळेरे परिसरातील निवृत्त कर्मचारी सत्कार ,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सत्कार, त्याचबरोबर खेळ पैठणीचा या नाविन्यपूर्ण खेळाचा जयंती सोहळ्या निमीत्त समावेश करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर, दारोम सरपंच—तेजस्वी लिंगायत, उपसरपंच— प्रवीण तळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबा गुरव ,कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र देवरुखकर ,आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र देवरुखकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रोहिदास महाराजांच्या कार्याची माहिती दिली. तर सर्व समाज बांधवांनी त्यांचे मौलिक विचार आपल्या जीवनात रुजवून आपले जीवन सार्थकी लावावे असे आवाहन केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण ,रामचंद्र पावसकर, सचिव संतोष जाधव, खजिनदार विजय देवरुखकर, सहखजिनदार दीपक देवरुखकर, सदस्य नारायण देवकर ,सत्यवान देवरुखकर, दारोम पोलीस पाटील संजय बेडसकर, विलास देवरुखकर, तसेच तालुका कार्यकारणी अध्यक्ष महानंदा चव्हाण ,तालुका उपाध्यक्ष शंकर चव्हाण, खजिनदार संजय चव्हाण, सचिव अविनाश चव्हाण. आदी मान्यवर व बहुसंख्य ग्रामस्थ कार्यक्रम स्थळी उपस्थित होते .यावेळी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे मानकरी ठरलेल्या सौ नेहा नारायण देवरुखकर आणि संजना संजय कळसकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बिळसकर यांनी केले ,तर उपस्थितांचे आभार संतोष जाधव यांनी मानले .शेवटी चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!