*कोकण Express*
*रोहिदास समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू- ना उदय सामंत*
*चिपळूण :*
शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात रोहिदास समाजाचे प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण या संस्थेतर्फे आयोजित श्री संत रोहिदास महाराज जयंती कार्यक्रमाप्रसंगी दिली.
हा कार्यक्रम चिपळूण येथील मार्कंडी मधील रोहिदास भवनमध्ये संस्थेचे चिपळूण अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी केले. तर मनोगतात अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर व कार्यकारणीच्या हस्ते करण्यात आले. तर संत रोहिदास महाराज जीवन चरित्र माहिती दिपक आंबोकर यांनी दिली.