हळवल फाट्यावर आंदोलन; संदेश पारकर आक्रमक..; हायवे प्राधिकरणाचा केला निषेध

हळवल फाट्यावर आंदोलन; संदेश पारकर आक्रमक..; हायवे प्राधिकरणाचा केला निषेध

*कोकण Express*

*हळवल फाट्यावर आंदोलन; संदेश पारकर आक्रमक..; हायवे प्राधिकरणाचा केला निषेध*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली हळवल फाट्यावर बाळू मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले, यावेळी फाट्यावर झालेल्या अपघात होऊन मृत्यु झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महामार्ग पूर्ण होऊन जवळपास पाच ते सहा वर्ष झाले आहेत. पाच ते सहा वर्षांमध्ये जनतेला नाहक त्रास झालेला आहे. हायवे प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे जनतेला नाहक आंदोलन करावी लागत आहेत.ही खंत माझ्यासारख्या राज्यकर्त्यांला आहे. याचे राजकीय फायदे आम्ही उठवायचे आणि सर्व सामान्य जनतेने आंदोलनाचा पवित्रा हातात घ्यायचा अशा प्रकारचं काम पाच ते सहा वर्षे सुरू आहे. महामार्ग पूर्णत्वात जात असताना या मार्गावर सातत्याने अपघाताची मालिका सुरू आहे. अपघातामध्ये निष्पाप लोकांचे बळी या हायवेमध्ये गेलेले आहेत.आणि किती बळी हायवे प्राधिकरण घेणार आहे ?हा प्रश्न जनतेचा हायवे प्राधिकरणाला आहे.अजूनही हायवे मध्ये गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळालेली नाही.अनेक प्रश्न हायवेच्या निमित्ताने प्रलंबित आहेत. असं असताना सुद्धा हायवे प्राधिकरणाने टोल सुरू करण्याचा डाव सुरू केला आहे. याला सुद्धा पूर्ण विरोध सिंधुदुर्गवाशीयांचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा टोल हा भरणार नाही आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये टोल माफी मिळालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका संपूर्ण जिल्हा वाशीयांची आहे. सातत्याने आजही तो लढा सुरू आहे म्हणून कुठेतरी लोकप्रतिनिधींचा आणि जनतेचा रेटा पाहून हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची टोल वसुली करण्याची हिम्मत झालेली नाही. आणि कधीही आम्ही टोल वसुली करू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने आणि जनतेने घेतलेली आहे.

ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने बाळू मेस्त्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे आंदोलन केलं. खरंतर या हळवल फाट्यावर सातत्याने अपघात होत आहेत इथल्या ग्रामस्थांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या असताना सुद्धा या ठिकाणच्या मागण्यांवर हायवे प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केलं जात आहे आणि पुन्हा या ठिकाणी अपघात झाला की आम्हाला पुन्हा हायवे प्राधिकरणाच्या विरोधात आवाज उठवावा लागतं . आजही तीच परिस्थिती आहे याच ठिकाणी अनेक अपघात झाल्यानंतर हे अपघात कशामुळे होतात याचा अभ्यास प्राधिकरणाने केलेला नाही आणि यावर कशा प्रकारचा आपण नियंत्रण आणू शकतो याचा सुद्धा अभ्यास केलेला नाही हे अपघात कशामुळे होतात त्याचा अभ्यास करून या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या गरज आहे.

मी हायवे प्राधिकरणाचा मनापासून निषेध करतो आणि आपण जनतेला किती वेळा या ठिकाणी उपोषण आंदोलन करायला लावणार आहात?
प्रत्येक वेळी जनतेनेच उठाव करायचा कॉन्ट्रॅक्टर आणि राजकर्त्यांनी फायदे उठवायचे आणि जनतेने मात्र सातत्याने आंदोलन करायचं हे चित्र या हावेच्या निमित्ताने सातत्याने दिसत आहे. ज्यांची जबाबदारी आहे .त्या अधिकाऱ्याने आणि प्रतिनिधींनी यावर निर्णय घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे.

जर हा महामार्ग लोकांचे सातत्याने बळी घेत असेल तर जिल्ह्यातील जनता सातत्याने विरोध अशाच प्रकारे करत राहणार आहे हा हायवे लोकांच्या फायद्यासाठी झाला की लढण्यासाठी झाला हा प्रश्न जनतेसमोर अजूनही अनुत्तरीत आहे म्हणून माझा ठिय्या आंदोलनाला संदेश पारकर म्हणून आणि शिवसेना म्हणून संपूर्ण पाठिंबा आहे असं वक्तव्य शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!