*कोकण Express*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
*ना.दिपक केसरकर मित्रमंडळाचे आयाेजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार 9 फेब्रुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील आरोग्य तपासणी तसेच कॅन्सर निदान शिबिर व महा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिराचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनारोजीन लोबो माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे
माजी नगरसेविका दिपाली सावंत भारती मोरे, प्रसन्ना उर्फ नंदू शिरोडकर आबा केसरकर गजानन नाटेकर नंदू गावडे सुजित कोरगावकर परशुराम चलवाडी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर विनायक सावंत अभिजीत मेस्त्री तसेच शैलेजा पारकर प्रतिमा सिंग अरुणा बांदेकर स्वप्ना नाटेकर पूजा नाईक नीलिमा चलवाडी सुवर्श्री गाड आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य शिबिराचे उद्घाटन दीपप्रजनाने झाले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी शिबिराचे उद्देश आणि होणाऱ्या उपचारांबाबत माहिती दिली यावेळी तज्ञ डॉ संदीप सावंत गिरीश कुमार चौगुले, डॉ आकाश एडकर तसेच डॉ वैशाली शिरोडकर यांनी कर्करोगाबाबत विशेषतः स्त्रिया आणि पुरुषांना मार्गदर्शन केले आणि तपासणी केली यावेळी वैद्यकीय कर्मचारी सिस्टर विजया उबाळे श्रीमती बागेवाडीकर, रेडकर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विभागाच्या आरोग्य मित्र शोभावती कोरगावकर शालिनी विरोडकर प्रगती कदम प्राची राणे अमृता मुंगी विद्या हेळेकर सुप्रिया नाईक जानवी कुसे यांची उपस्थिती होती