*कोकण Express*
*चिपळूण च्या लोककला महोत्सव ची सांगता*
*अभिनेत्री अक्षता कांबळी च्या मालवणी बोलीतील गाऱ्हाणे ठरले लक्ष्यवेधी*
महिला दशावतार सादरीकरणाने शेवट गोड झाला .यावेळी अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ ,सन्मानचिन्ह, सन्मान पत्र,तसेच रोख रक्कम देऊन सौ कांबळी यांना सन्मानित करण्यात आहे ,ह्या महोत्सव मध्ये सिंधुदुर्ग च्या एकमेव कलाकार सौ कांबळी ह्या सत्कार मूर्ती ठरल्या याचा सिंधुदुर्ग वाशीयांना अभिमान च आहे .
: चिपळूण ही कोकणची सांस्कृतिक राजधानी, अनेक समंलेने, सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव चिपळूणने यशस्वी केले आहेत. चार दिवस रंगलेल्या लोककला महोत्सवाने चिपळूणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक, लोककला महोत्सव संयोजन समितीचे प्रमुख डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केली. अष्टपैलू अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या सिंधूरत्न फाऊंडेशन, कणकवली प्रस्तुत महिला दशावताराने या लोककला महोत्सवाची सांगता झाली. हा अखेरचा लोकप्रकार पाहाण्यासाठी रसिकांची मोठी गर्दी होती.
महिलांच्या दशावतार सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली. सर्वच महिला कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. संगीत साथ आणि गायनही कोतुकास्पद पात्र ठरले.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, अप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामने श्री देव जुना कालभैरव मंदिराच्या सागावकर मैदानावर सलग चार दिवस रंगलेल्या लोककला, खाद्य, पर्यटन महोत्सवाची सांगता बुधवारी झाली. या वेळी डॉ. चोरगे बोलत होते. समारोप प्रसंगी लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, लोटिस्माचे मार्गदर्शन प्रकाश देशापांडे, लोककला विभागाचे प्रमुख प्रा. संतोष गोनबरे, डॉ. विजय रिळकर, यशस्वी बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर, श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त समीर शेट्ये, परशुराम सागावकर आदी उपस्थित होते .अनुबंध व शाश्वत पर्यटन या दोन महत्वाच्या विषयांवर परिसंवाद रंगला. सायंकाळी लोककला महोत्सवातील लोककला सादरीकरण कार्यक्रमाची सुरुवात अष्टपैलू अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या खास मालवणी बोलीतील गाऱ्हाण्याने झाली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या भारदस्त आवाजात मालवणी गाऱ्हाणे घालणाऱ्या अक्षता कांबळी ह्या पहिल्याच महिला कलाकार आहेत त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे .कार्यक्रम चा समारोप अक्षता कांबळी यांच्या सिधुरत्न महिला दशावतार ने झाला . या वेळी प्रा. संतोष गोनबरे यांनी कोकणातील लोककलांना व्यासपीठ मिळावे, पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या लोककला एकाच व्यासपिठावर सादर व्हाव्यात, त्या जगासमोर याव्यात, लोककलांचे एकत्रित संकलन व्हावे, आमचा असलेला उद्देश साध्य झाल्याचे सांगितले. डॉ. यतिन जाधव यांनी लोटिस्माच्यावतीने सहभागी सर्व कलाकार, सहकार्य करणाऱ्याचे आभार मानले. या वेळी लोककला जपण्यासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान करण्यात आला. जाखडी-नमन लोककलेतील रानपाट येथील अर्जुन मोर्य, नमन-नाटक कलाप्रकारातील नारदखेरकीतील पांडुरंग बांद्रे, लोकगीतांची परंपरा जपणाऱ्या बावनदी येथील सुवर्णाताई पाथरे, सिंधुदुर्गातील पहिले महिला दशावतार सुरु करणाऱ्या कणकवलीतील अक्षता कांबळी, भेदीकी शाहीरी परंपरा जपणारे देवरुख-मुरादपूर येथील नारायण तथा आबा खेडेकर यांचा मान्यवरांच्या हस्त्ो सन्मान करण्यात आला. कोकणचे सौंदर्य, खाद्य संस्कृती जगभर पोहोचविणारे पर्यटन दूत आशुतोष बापट, वैभव सरदेसाई, प्रसाद गावडे, सचिन कारेकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित गोडबोले, योगेश बांडागळे यांनी केले, तर आभार धीरज वाटेकर यांनी मानले .