*कोकण Express*
*भाजपाच्या सभेमुळे भराडी मातेच्या भाविकांना विनाकारण वाहतूक कोंडीचा मनस्ताप – आ.वैभव नाईक…*
*सिंधुदुर्ग बदलतोय ही टॅग लाईन होती ती कशासाठी?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आंगणेवाडीत भराडी मातेच्या यात्रेदिवशी भाजपाने आनंद मेळावा घेतला तो कशासाठी घेतला होता? तो मेळावा फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठी आणि नारायण राणेंना राजकीय निरोप देण्यासाठी होता का? आंगणेवाडी राज्यातून लाखो भाविक या यात्रेला येतात,असे असताना सभेमुळे भाविकांना ५-५ तास वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागला.मुळात ना.रविंद्र चव्हाण यांच्या सभा आयोजनामुळे राणेंचा तळतळाट त्याच्या बोलण्यातून जाणवला आहे. सिंधुदुर्ग बदलतोय..म्हणजे काय? हिम्मत असेल तर भाजपाने मुंबईची निवडणूक लावावी,मग समजेल कोकणी माणूस कोणासोबत आहे तो?असे खुले आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले.
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.भाजपाच्या या मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली.त्याबद्दल आक्षेप नाही मात्र,५-५ तास भाविकांना वाहनात बसावे लागले. काही लोक दर्शन न घेताच माघारी परतले.सिंधुदुर्ग बदलतोय ही टॅग लाईन होती ती कशासाठी? आमच्या सरकारच्या काळातील काही रस्ते भाजपाच्या ठेकेदारांनी केली नव्हती,असा टोला आ.वैभव नाईक यांनी लगावला.
भाजपा मेळाव्यात ५५० लोकांचा सत्कार करण्यात आला.ज्यावेळी राणे काँगेस मध्ये गेले तेव्हाही अशीच सूज काँग्रेसला आली होती.मात्र,माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांने त्यांचा पराभव केला.भर सभेत राणेंनी भाषण करताना मी ३० वर्षे काम केल्यामुळे एवढे लोक्रतिनिधी झाले असल्याचे वारंवार सांगत होते.त्या ठिकाणी मी भाजप सोडणार नसल्याचे सांगत होते.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला उभे राहताच फटाके लागले,हे देखील राणेंना पटले नाही.राणे आणि ना.रविंद्र चव्हाण यांच्या मध्ये असलेला सुप्त वाद निर्माण झाला आहे,हे या भेटून दिसून आल्याचा टोला आ.वैभव नाईक यांनी लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय केले? तर जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज मंजूर केलं हे काम शिवसेनेने केलं आहे.राणेंनी जुने आरोप पुन्हा करु नयेत.मी देखील अनेक कॉलेज काढली आहेत.आम्ही देखील आवश्कतेनुसार काम करत आहोत.आशिष शेलार यांनी २० वर्षे सत्ता भोगली आहे.त्यांना शिवसेनेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.जर तुमच्यात हिमंत असेल तर मुंबई महानगर पालिका निवडणूक घ्यावी,त्यावेळी कोकणी माणूस आणि जनता कोनासोबत आहे,हे भाजपला समजेल,असे खुले आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले.
ज्या लोकांना ३० कोटींचा दंड झाला त्यांना तो दंड माफ केला जातो. मात्र,दबावासाठी जिल्ह्यातील १५० डंपर चालकांना दंड केला.त्यांच्या पोटावर पाय देण्याचा,त्यांना त्रास दिला जात आहे.काही वाळू व्यावसायिकांना भाजापात प्रवेश करा,म्हणून सांगितले जात आहे. जे कमी दराचे सिलेंडर दिले आता लोक बोब मारत आहेत. भाजपाने सांगावे,हजारो सिलेंडर त्याच्या कार्यालयात जमा होतील.आमच्यावर कमिशन चा आरोप करणाऱ्या राणेंनी त्या कामांचे टेंडर प्रक्रिया झालीच नाही.मात्र,राणेंच्या मुलाने नानारला विरोध केला आता कमिशन साठी विरोध मावळला का? आमच्यावर दबाव असूनही पक्ष बदलत नाही.नितेश राणेंनी माझ्या राजकीय भविव्याबाबत काळजी करु नये,असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.
जिल्ह्यात भाजपाने सिंधुदुर्ग बदलतोय..अशी टॅग लाईन करत सभा घेतली.प्रशासन मध्ये मुख्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.सभेमुळे लोकांच्या काही रोष आहे. हे येत्या निवडणुकीत दिसून येईल.राणेंना आपण न केलेली कामे दिसली की राणेंचा जळफळाट होत आहे.कालच्या सभेमुळे मुंबईत २० नगरसेवक शिवसेनेचे वाढतील.राणेंनी २४ तास काम केले तर काँगेसची सत्ता गेली.आता केद्रीय मंत्री म्हणून राणेंनी कोकणात काय काम केले? आता भाजपची सत्ता जाईल,असा टोला आ.वैभव नाईक यांनी लगावला.