*कोकण Express*
*तळेरे येथे प्रमोद कोयंडेच्या “प्रेम म्हणजे प्रेम आसत” या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतीसाद*
*कासार्डे ; संजय भोसले*
गेल्या 100 वर्षातील मोजक्या प्रेम कवितांची नव्या आविष्कारातील एक मेजवानी म्हणजे लेखक प्रमोद कोयंडे यांचा “प्रेम म्हणजे प्रेम असतं” हा कार्यक्रम. तळेरे येथे हा कार्यक्रम नुकताच झाला आणि रसिकांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमाची सुरुवात केशवसुत यांच्या रुष्ट प्रेयसी या कवितेने झाली. त्यानंतर अगदी अलिकडच्या विविध कवींच्या कविताही यामध्ये ऐकायला मिळतात. अनेक ऐकलेल्या आणि कधीही न ऐकलेल्या कविता यामध्ये ऐकायला मिळतात. शिवाय, अधूनमधून प्रमोद कोयंडे यांची विश्लेशनात्मक माहिती रसिकांना ऐकायला मिळते.
या कार्यक्रमाच्या निमीत्ताने प्रमोद कोयंडे यांनी अनेक कवींना एकत्र आणले आहे. केशवसुत यांची रुष्ट प्रेयसी, बालकवी यांची प्रेमाचे गाणे, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज यांच्या प्रेम योग, पृथ्वीचे प्रेमगीत, मंगेश पाडगावक : प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्याने प्रेम केलं, बा. भ. बोरकर यांच्या सूर्याचे प्रेमगीत, तव नयनांचे दल हलले गं, तू गेल्यावर, ना. धो. महानोर यांची कविता, शंकर वैद्य यांची हा असा पाऊस पडत असताना, विंदा करंदीकर यांची साठीचा गजर, मधुसूदन नानिवडेकर यांची हल्ली तू, शांता शेळके यांची हे विश्व प्रेमिकांचे, नारायण सुर्वे यांची तेव्हा एक कर, वसंत बापट यांची जीना, किशोर कदम यांची बघ माझी आठवण येते, बा. भ. बोरकर यांची त्या दिसा वड़ाकडे अशा अनेक कविता ऐकायला मिळतात.
कार्यक्रमाच्या शेवटी किशोर कदम यांची कविता भाव खाऊन जाते. तर बा. भ. बोरकर यांची त्या दिसा वड़ाकडे ही गायिलेली कविता अनेकांना भावली.