प्रवीण काकडे राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत

प्रवीण काकडे राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत

*कोकण Express*

*प्रवीण काकडे राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत*

*कासार्डे ; संजय भोसले*

प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल पद्मश्री दादासाहेब इदाते यांच्या राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

प्रवीण काकडे हे गेली कित्येक वर्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करत असुन कोरोना काळात अहिल्या देवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट च्या वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ च्या वतीने राज्यातील डोंगरी व दुर्गम भागातील व अतिवृषटीत नुकसान झालेल्या व दरड ग्रस्त भागातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे असे प्रतिपादन मा दादासाहेब इदाते राष्ट्रीय अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती आयोग भारत सरकार यांनी केले…..ते मा प्रवीण काकडे यांना ईगल फौंडेशन च्या वतीने एम आय  टी युनिवर्सिटी कोथरूड पूणे येधे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्या प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईगल फौंडेशन चै अध्यक्ष मा विलासराव कोळेकर हे होते तर प्रमुख अतिथी सांगलीचे माजी महापौर प्रा नितीन सावगावे व प्रा डाॅ महेश पाटील सदस्य सेन्सॉर बोर्ड हे होते..प्रविण काकडे यांनी सातारा सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे या सातही जिल्ह्य़ातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव व जंगलातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत व महापुर व अतिवृषटीत नुकसान झालेल्या भागातील व दरड गस्त भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आतापर्यंत ४२९३ विद्यार्थीना मदत करून काही ना शैक्षणिक फी भरून सहकार्य केलै व स्वता कोरोना गस्त असताना त्यावर यशस्वी मात करून पुन्हा सर्वाना मदत करण्यास पुढाकार घेऊन समाजात ग्राउंड लेव्हल  जाऊन समाजप्रबोधन व जनजागृती अभियान राबवून समाज जागृत करण्याचे काम आजही सूरू असुन आपली स्वतःची नोकरी सांभाळून प्रत्येक सुट्टीच्या दिवशीच सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर एक महान आदर्श घालून दिला म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.[हापुरस्कारकाकडेसाहेब यांनी गोरगरीब वंचितघटकातील समाजबांधव व गोरगरीबवंचितघटकातील  विद्यार्थी व ज्यानी तनमनधन देऊन सहकार्य  केले त्या मित्रसमाजबांधवयांनाबहाल करतो]………. कार्यक्रमास राज्य उपाध्यक्ष सुनील शेंडगे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाषराव येळे महिला अध्यक्ष प्रा डाॅ श्वेता चौधरी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे  पुणे जिल्हाध्यक्ष नथुराम डोईफोडे  प्रा शितल काकडे   एन जी खरात लक्ष्मण बोडेकर संतोष  वरक  योगेश खरात कृष्णा बंडगर पांडुरंग गोरे इंद्रजीत ताटे अजित ताटे इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!