ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने पडेल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने पडेल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

*कोकण Express*

*ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने पडेल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*

*शिबिरात १०५ नेत्र रुग्णांची मोफत तपासणी*

*कासार्डे ; संजय भोसले*

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तसेच आय हॉस्पिटल नेत्रालय (कणकवली), पडेल रिक्षा चालक मालक संघटना, पडेल व्यापारी संघटना,हिंन्दूस्थान मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल कॅन्टीन येथे सत्यनारायण पूजेचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन ता.देवगड-पडेल कॅन्टीन या ठिकाणी आयोजित केले होते. या शिबिराचा लाभ १०५ नेत्र रुग्णांनी घेतला.

या शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने केले होते.
नेत्र शिबिराचे उद्घाटन पडेल नवनिर्वाचित सरपंच भूषण पोकळे यांनी केले.
त्यावेळी उपस्थित उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, ग्रामपंचायत सदस्य, रिक्षा संघटना अध्यक्ष रामकृष्ण पाटणकर, व्यापारी संघटना अध्यक्ष जयेश तानवडे, त्याचप्रमाणे ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर, जिल्हा संघटक मंदार काणे, तालुका सचिव महेंद्र देवगडकर, तालुका महिला संघटक सौ.आदिती तानवडे, सदस्य शेखर दोडामणी,आसिफ मुल्ला,डॉ.जावेद खान, लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ.अशोक कदम,स्पेक्टो मार्टचे मंगेश चव्हाण व रिक्षा चालक- मालक, व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!