*कोकण Express*
*लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर*
*समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम*
दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून या शिबिराचे आयोजन केलेले आहे.
हर्निया, हायड्रोसील, अनडिसेंडेड टेस्टीस व सरकमसिजन (सुन्ताचे ऑपरेशन) अशा अॅापरेशनला १५,०००/- ते २५,०००/-रुपये खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या मार्फत मोफत होणार आहेत. या अनुषंगाने तपासणी शिबिर सोमवार 06 फेब्रुवारी 2023 रोजी संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे सकाळी ९ ते सकाळी ११ या वेळेत आयोजित केलेले आहे. सदर तपासणी शिबिर व होणाऱ्या शस्त्रक्रियाही पूर्णपणे मोफत आहेत. सदरच्या शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांसमवेत मुंबईतील प्रसिद्ध बाल शल्यचिकीत्सक डॉ. राजीव रेडकर यांच्याकडून होणार आहेत. सदर मोफत तपासणी शिबिर व मोफत शस्त्रक्रिया यांचा लाभ सिंधुदुर्गवासियांनी घ्यावा असे आवाहन समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी आणि संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे यांनी केले आहे. सदर शिबिरासाठी 9421237887 या क्रमांकावर नोंदणी करावी.